आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार’:तन्वी, संतोष, मोहन यांना ‘विशाखा काव्य पुरस्कार’

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचे आणि नवोदितांना प्रोत्साहन ठरणारे महत्त्वाचे असे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ‘विशाखा काव्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आल्याचे कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक डाॅ. प्रवीण घोडेस्वार यांनी सांगितले. काेविड काळामुळे २०१९ आणि २०२० मध्ये हे पुरस्कार देण्यात आले नव्हते. आता या वेळी दोन्ही वर्षांचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यात वर्ष २०१९ चे तन्वी अमित यांच्या ‘निष्पर्ण फांदीवरचे पक्षी’, संतोष आळंजकर ‘मातीत हरवल्या कविता’, मोहन शिरसाट ‘नाही फिरलो माघारी’ आणि वर्ष २०२० चे विशाखा विशाखा ‘तुमुल अंतरीचे’, संदीप जगदाळे ‘असो आता चाड’, विनायक पवार ‘नामुष्कीचे पिढीजात वर्तमान’, अनिल साबळे ‘टाहोरा’, गजानन फुसे ‘दिवस बोलू देत नाही’ यांना पुरस्कार जाहीर झाले.

बातम्या आणखी आहेत...