आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक:मतदारांचा सहकार; आपला ला केले परके

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या १० वर्षांपासून संचालक मंडळाची अविराेध निवड हाेणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची काही सदस्यांच्या हट्टामुळे या पंचवार्षिक मध्ये निवडणूक घेण्यात आली. यात सत्ताधारी ‘आपला’ पॅनलच्या उमेदवारांचा धुव्वा उडवत सभासदांनी ‘सहकार’ पॅनलवर विश्वास दाखवत संपूर्ण उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली. जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक दाेन पंचवार्षिकपासून अविराेध करण्यात येत हाेती.

या पंचवार्षिकमध्येही निवडणूक अविराेध करण्यासाठी प्रयत्न झालेे. यासाठी सात सदस्यांची काेअर कमिटी तयार करण्यात आली हाेती. कमिटीच्या सदस्यांनी बैठका घेऊन काही सदस्यांच्या हट्टामुळे ताेडगा निघाला नाही. त्यामुळे निवडणूक झाली. संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी दाेन्ही पॅनलच्या ३० जणांसह अन्य १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले हाेते.

मनमानी कारभाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालकांचा मनमानी कारभार सुरू हाेता. कर्मचाऱ्यांना दमबाजी केली जात हाेती. त्याची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. - प्रमाेद निरगुडे, नेते सहकार पॅनल

आराेग्य विभाग व अभियंता विभागामुळे बसला फटका
आम्ही सर्व संवर्गाच्या लाेकांना साेबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अभियंता व आराेग्य विभागाचा आमच्याकडे उमेदवार नव्हता. त्याचाच आम्हाला माेठा फटका बसला आहे. - विजयकुमार हळदे, नेते आपला पॅनल

काही उमेदवारांनी दाेन ते तीन ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. या निवडणुकीत आराेग्य विभाग व लिपिक संवर्गीय विभागाने किंग मेकरची भूमिका केली. रविवारी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात आले हाेते. रात्री सर्वच जागांचे निकाल जाहीर करण्यात असून सर्वच जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयश्री खेचून आणण्यासाठी सहकार पॅनलचे नेते प्रमाेद निरगुडे, बाळासाहेब ठाकरे, रवींद्र आंधळे, रवींद्र थेटे, मंदाकिनी पवार, विलास शिंदे, जितेंद्र पाटील, विजय देवरे आदींनी परिश्रम घेतले.

हे आहेत विजयी उमेदवार
सर्वसाधारण गट : सचिन दत्तात्रेय अत्रे, अमित शामराव आडके, रवींद्र काेंडाजी थेटे, रंजन अशाेक थाेरमिसे, नितीन कचरू पवार, चंद्रशेखर कृष्णा पाटील, सचिन दामाेदर पाटील.

तालुका प्रतिनिधी : किशाेर श्रीराम अहिरे, गणेश दशरथ गायकवाड, नंदकिशाेेर बाळकृष्ण साेनवणे.

इतर मागासवर्ग : विक्रम विश्वनाथ पिंगळे, भटक्या जाती जमाती - अनिल एकनाथ दराडे, अनुसूचित जाती जमाती -मंगेश सावळीराम जगताप, महिला प्रतिनिधी - अर्चना वसंत गांगाेडे, सरिता नानाजी पानसरे (खैरे).

बातम्या आणखी आहेत...