आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:उद्या मतदार याद्या होणार प्रसिद्ध;  1 जुलैपर्यंत हरकतींची संधी

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून, त्यावर २३ जून ते १ जुलैपर्यंत हरकती व सूचना मांडता येतील. राज्य निवडणूक आयोगाने नाशिक महापालिकेची त्रिसदस्यीय प्रभागरचना अंतिम करत ३१ मे रोजी अनुसूचित जाती व जमाती तसेच महिला आरक्षण हरकत व सूचनांची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित करून प्रारूप मतदार याद्या १७ जूनला प्रसिद्ध होणार होत्या. मात्र, या याद्यांकरिता ३१ मेपर्यंतच्या विधानसभा मतदार याद्या ग्राह्य धरण्याचे आयोगाचे आदेश दिल्यामुळे आयोगाने मतदार याद्यांचा सुधारित कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार गुरुवारी (दि. २३) प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून त्यावर हरकती व सूचनांंकरिता १ जुलैपर्यंतची मुदत दिली जाणार आहे.

त्यानंतर ९ जुलै रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान, मतदार याद्या तयार करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे आदी कार्यवाही आयोगाकडून केली जात नसल्यामुळे हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदीसंदर्भातच दुरुस्त्या करता येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...