आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष अभियान:मतदान कार्ड-आधार जाेडणी ; आज पश्चिम विभागात विशेष माेहिम

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यातील कलम २३ नुसार मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे ‘आधार’ची माहिती संग्रहित करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदारांसाठी रविवारी (दि. ४) मतदान कार्ड व आधार जाेडणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गंगापूर, आनंदवल्ली, सिडको, अंबड, कामटवाडे, चुंचाळे, पाथर्डी, पिंपळगाव बहुला व सातपूर या ठिकाणी मतदान केंद्रावर रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदारांनी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान कार्डास आधार कार्ड जोडणी करुन घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार दीपाली गवळी यांनी केले आहे. मतदारांनी घराजवळील मतदान केंद्रावर यासाठी सुविधा उपलब्ध असून ही जाेडणी माेफत आहे.

मध्य मध्ये सीएससी केंद्रावर जोडणीची सुविधा
नाशिक मध्य विधानसभा(१२४) मतदार संघातील सीएससी सेंटर चालकांनी केंद्रात येणाऱ्या सर्व नागरिकांचे व त्यांचे कुटूंबातील व्यक्तीचे आधारकार्ड मतदार ओळखपत्राशी Voter Helpline APP किंवा www.nvsp.in या संकेतस्थळावर माेफत जाेडणी करून द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...