आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Waiting For Land Acquisition For Years Despite Land Acquisition; Demand Of Maharashtra Chamber Delegation For Allotment Of Seats To MIDC | Nashik Marathi News

दिव्य मराठी विशेष:भूसंपादन होऊनही वर्षानुवर्षे भूखंडाची प्रतीक्षा ; महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाची एमआयडीसीकडे जागा देण्याची मागणी

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा हस्तांतरित झालेल्या आहेत तरीही उद्योगांसाठी जागा उपलब्ध होत नाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योजकांना उद्योगासाठी त्यांच्या मागणीनुसार जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्याकडे केली. चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, एमएसएमई समितीचे चेअरमन आशिष नहार यांच्यासमवेत उद्योजकांच्या शिष्टमंडळाने गवळी यांच्याकडे ही मागणी केली आहे.

जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोठे उद्योग आलेले नाहीत. अनेक उद्योग बंद अथवा स्थलांतरित होत आहे त्यामुळे नाशिकचा औद्योगिक विकास खुंटला आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरू करण्यासाठी अनेक उद्योजकांचे जागेच्या मागणीचे अर्ज वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला व रोजगार निर्मितीला खीळ बसली आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास लवकरात लवकर होणे गरजेचे असून सिन्नर दिंडोरी राजूर बहुला इगतपुरी येथील जागा उद्योजकांना त्यांच्या उद्योगांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. उद्योगांना या जागा लवकर मिळाल्यास नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.

नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांचा विकास होण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना त्यांच्या मागणीनुसार जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी यावेळी सांगितले. गवळी यांनी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्याचे काम प्रगतिपथावर चालू असून उद्योजकांच्या प्रलंबित जागेच्या मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन महाराष्ट्र चेंबरला दिले.

बातम्या आणखी आहेत...