आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकांचे ज्वलंत प्रश्न:साडेतीन वर्षांपासून बैठकीची प्रतीक्षाच

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योजकांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल साडेतीन वर्षांपासून प्रलंबित असलेली जिल्हा उद्योग मित्र (झूम)ची बैठक तातडीने व्हावी याकरीता उद्याेजक आता आक्रमक झाले आहेत. ही बैठक हाेत नसल्याने उद्याेगांपुढच्या समस्या वाढल्या असल्याने उद्याेजकांचा राेष वाढत चालला आहे. ही बैठक तातडीने घ्यावी याकरीता अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन(आयमा)च्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक शैलेश रजपूत यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे.

नाशिक जिल्ह्यातील विविध स्वरूपाच्या उद्याेगांच्या समस्या, अडचणी वेळच्या वेळी सुटाव्यात याकरिता जिल्हा उद्याेगमित्र समिती (झूम) ची बैठक नियमित व्हावी, असे संकेत आहेत. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून समन्वयक जिल्हा उद्याेग केंद्राचे महाव्यवस्थापक असतात. उद्याेगांशी निगडीत, संबंधित सर्वच यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहतात, त्यातून बैठकीत उद्याेजकांच्या संघटनांनी मांडलेल्या समस्या, प्रश्न येथे साेडविल्या जातात. याचमुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र साडेतीन वर्षापासून ही बैठकच झालेली नाही. यामुळे उद्याेजकांत राेष आहे.

नाशिकच्या अंबड व सातपूर येथील औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील आैद्याेगिक वसाहतींमधील सुरक्षा व्यवस्था, वसाहतीतील प्रमुख रस्ते तसेच अंतर्गत रस्ते, पथदीप, नालेसफाई, पाण्याची कमतरता आदी प्रश्नांनी उद्योजक हैराण झालेले असून त्याबाबत तातडीने मार्ग काढण्यास झूम बैठक तातडीने घेण्यात यावी, अशी मागणीही याबाबतच्या निवेदनात करण्यात आली.

याबाबतचे निवेदन आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, जनरल सेक्रेटरी ललित बूब यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन जिल्हा उद्याेग केंद्राचे सहसंचालक रजपूत यांना सुपूर्द केले.

अधिकाऱ्यांना तीन निवेदने देऊनही बैठक नसल्याने वाढता राेष
नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयमा ही संघटना प्रयत्न करते. या संघटनेचे अंबड, गाेंदे, सातपूर, सिन्नर आैद्याेगिक वसाहतींतील २५०० हून अधिक उद्याेजक सदस्य आहेत. या उद्योजकांचे अनेक मूलभूत प्रश्न, विविध समस्या आहेत. परंतु गेल्या साडेतीन वर्षांत झूमची ही बैठक न झाल्याने उद्योजक संभ्रमात आहेत. ही बैठक घेण्यात यावी यासाठी यापूर्वीही जिल्हा उद्याेग केंद्र महाव्यवस्थापकांकडे तीन वेळा निवेदने देण्यात आली आहेत. यानंतरही जिल्हा उद्याेग केंद्राकडून बैठक न घेतल्याने आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, जनरल सेक्रेटरी ललित बूब आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...