आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध वेशभुषा परिधान केलेल्या महिल्या...विविध क्षेत्रात कर्तुत्ववान ठरलेल्या महिलांचे पाेस्टर घेवून सहभागी माेठ्या उत्साहात सहभागी झालेल्या 2500 हून महिलांनी आराेग्यसंवर्धनाचा संदेश दिला निमित्त हाेते वुमन वाॅकेथाॅनचे.
कुटंुब व संसाराची जबाबदारी पार पाडत असतांना महिलांनी आपल्या आराेग्याकडे लक्ष द्यावे, आराेग्यसंवर्धनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सोनाली दाबक यांच्या संकल्पनेतून 2017 साली सुरू झालेल्या नाशिक वूमेन वॉकेथॉनचे आयाेजन करण्यात येते. यंदाही रविवार दि.5 या वुमन वाॅकेथाॅनचे पाचवले पर्व माेठ्या उत्साहात रंगलावॉकेथॉन ची सुरुवात जिल्हा परिषदेच्या सीईओ आशीमा मित्तल आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून करण्यात आली. . बॉईज टाऊन पब्लिक स्कूल ते कॉलेज रोड या मार्गावर वाॅकेथाॅन् रंगला.
वुमन ऑफ इंडिया- भारताच्या वाटचालीत स्त्रियांचे योगदान' या थीमवर आधारित विविध प्रकारच्या वेशभूषा करून भारतातील अनेकविध मोठ्या कर्तुत्ववान महिलांची ओळख करून देणारे पोस्टर्स घेऊन अतिशय उत्साहाने चार वर्षाच्या मुलीपासून ते 85 वर्षाच्या आजी पर्यंत महिला अमाप उत्साहाने सहभागी झाल्या होत्या . वॉकेथॉनमध्ये तीन किलोमीटरचे अंतर पूर्ण करणाऱ्या प्रत्येक महिलेला मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध गटांमध्ये वैयक्तिक आणि सांघिक पारितोषिक महिलांना दिली गेली. वॉकेथॉन च्या सुरवातीला महिला बाईक रायडर्स तसेच महिला सायकलिस्ट यांनी वॉक चे नेतृत्व केले.
बेबी वाॅकही ठरले आकर्षण
या वुमक वाॅकेथाॅनचे प्रमुख आकर्षण ठरले ते मदर अँड बेबी वॉक.या यामध्ये सुद्धा सुमारे 125 महिला आपल्या पाच वर्षा आतील मुलांना घेऊन अतिशय उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. मदर अँड बेबी वॉक मध्ये सहभागी महिला आणि त्यांच्या मुलांना विविध प्रकारची पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.