आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलवाहिनी जोडणी तसेच दुरुस्तीच्या कामामुळे पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक 4, 5 व 6 परिसरात आज शुक्रवारी 10 जून रोजी दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी (ता. 11) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
प्रभाग क्र. 4 मधील पेठ रोड कॅनॉललगतचा परिसर, हरीओमनगर, पेठरोड वजनकाटा जवळील परिसर, फुलेनगर परिसर, विजय चौक, राहूलवाडी, भराडवाडी, लक्ष्मणनगर, वडारवाडी, पेठ रोडवरील शनी मंदिरासमोरील परिसर, दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी टॉकीजमागील रामनगर परिसर, लोकसहकारनगर, आदित्यकुंज सोसा ते युनियन बँक ते निमाणी पर्यंतचा परिसर, प्र क्र. 5 मधील दत्तनगर, कुमावत नगर, शिंदेनगर, नवनाथनगर, द्रोणागिरी, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, जाणता राजा कॉलनी, भन्साळी मळा, रोहिणी नगर, नवरंग मंगल कार्यालय परिसर, पेठ नाका व मखमलाबाद नाका परिसर, इंद्रकुंड, मालेगाव स्टँड व चिंचबन परिसर तसेच पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रातील जलकुंभावरून रामवाडी जलकुंभ भरणा होत असल्याने सदर जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र 6 मधील रामवाडी परिसर, आदर्शनगर, कौशल्यानगर, बुरकुलेनगर, कोठारवाडी, रामनगर, बच्छाव हॉस्पीटल परिसर, कलाआई मंदिर परिसर, नागरे मळा, क्रांतीनगरचा काही भाग, तळेनगर, उदय कॉलनी काही भाग, मोरे मळा काही भाग, तुळजाभवानी नगर, रामकृष्णनगर, भावबंधन मंगल कार्यालयाजवळील काही भाग इत्यादी परिसरात तसेच शुक्रवारी दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.
शनिवारी (ता. 11) रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.