आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वेळ पाहुनी या, प्याद्याचा वजीर सुद्धा होऊ शकतो..:साहित्याच्या मेळ्यात गझल कटट्याचे थाटात उद्घाटन, अस्सल रचनांनी कार्यक्रमात रंगत

महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''ती येताना संथ झरे हे करती खळखळ गालावरती खळी उमलता नभात गडगड'' यासह विविध गझलांनी गझल कट्टा रंगत गेला. निमित्त होते वर्धा येथील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे.

आज गझल कट्ट्याचे उदघाटन साहित्‍य संमेलन समितीचे सल्‍लागार डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते झाले. 'गझल' या कविता प्रकारावर उर्दू भाषेचा जरी पगडा असला तरी मराठी गझलने आपले वेगळेपण जपले आहे. अनेक मराठी गझलकार मागील काही काळात नावारुपाला आले असून या प्रांतात उत्‍तम कार्य क‍रीत आहे. मराठी गझलेला चांगले दिवस यायचे असतील तिने सर्वसमावेश भाव स्वीकारावा, असे ते म्हणाले.

''सरळ चालतो सरळ वागतो

म्हणून क्षुल्लक नकोस समजू

वेळ पाहुनी या प्याद्याचा

वजीर सुद्धा होऊ शकतो''

अशा गझलांचा पाऊस सम्मेलनात बरसला. संमेलनाच्‍या पहिल्‍या द‍िवशी कविवर्य सुरेश भट गझल कट्ट्यासाठी एकुण 538 गझल आल्‍या होत्‍या. त्‍यापैकी 240 गझलची निवड करण्‍यात आली. या सत्राच्‍या अध्यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक व गझलकार आशा पांडे होत्‍या. मंचावर अ. भा. मराठी साहित्‍य महामंडळ सदस्‍य दगडू दादा लोमटे व गजानन नारे, विदर्भ साहित्‍य संघ वर्धा शाखेचे संजय इंगळे, राज्‍य माहिती आयुक्‍त राहूल पांडे व समन्‍वयक नितीन देशमुख यांची उपस्‍थ‍िती होती.

विनायक लळित, रमेश सरकाटे, जयप्रकाश सोनूरकर, गुलाब मेश्राम, अरविंद उन्हाळे, उज्वला इंगळे, जयंत कुलकर्णी, प्रशांत भंडारे, अरुण विघ्ने या गझलकारांना प्रामुख्‍याने कार्यक्रमात सहभाग होता.

आशा पांडे यांनी मराठी गझलांचे सम्राट सुरेश भट यांच्‍या तसेच, विदर्भातल्या गझलकारांच्‍या योगदानावर प्रकाश टाकला. यावेळी त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...