आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:‘वारली कलेने आदिवासी महिलांना व्यक्त होण्याची संधी’; हे प्रदर्शन दि. 8 मेपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत विनामूल्य खुले राहील

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या वारली कलेने आदिवासी महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली. त्यांनीही ११०० वर्षांची परंपरा जतन केल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.

वारली आर्ट फाउंडेशन आणि पीएनजी आर्ट इनिशिटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने समूह वारली चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सतीश मोहोळे, प्रवीणा दुसाने उपस्थित होते. अपूर्वा भंडारे, हर्षदा माळी, पद्मजा ओतूरकर या कलाकारांनी मनोगत व्यक्त केले. सुप्रिया देवधर हिने सूत्रसंचालन केले. डॉ. मंगला वाघमारे यांनी आभार मानले. हे प्रदर्शन दि. ८ मेपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत विनामूल्य खुले राहील.

बातम्या आणखी आहेत...