आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाच्या झळा:अकोला, चंद्रपुरात 11 मेपर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा; चंद्रपूरला मागे टाकत जळगावचा पारा 44.5 अंशांवर

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शनिवारी (७ मे) जळगाव येथे सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात ढगाळ हवामान असल्याने कमाल तापमानात काही अंश घसरण झाली होती. अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात ११ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूर हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात कमाल तापमान चाळीस ते बेचाळीस दिवस अधिक राहिल्याने नागरिकांना यंदा उष्णतेचा दीर्घकाळ सामना करावा लागला. शनिवारी कमाल तापमान येथे सरासरीइतके होते.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, नाशिकमध्ये कमाल तापमानात वाढ झाली होती. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमानजवळ गोलाकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे ८ मे रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात मात्र कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने तेथे नागरिकांना सर्वसामान्य वातावरणाचा अनुभव मिळत आहे. दरम्यान, देशात मान्सूनचे आगमन दहा दिवस अगोदर होणार, अशी बातमी खासगी संस्थांनी दिली असली तरी भारतीय हवामान विभागाने याबाबत कोणताही दुजाेरा दिला नाही.

हवामान विभागाकडून मान्सूनबाबत माहिती नाही
देशात मान्सून दाखल होण्यासंबंधी काही दिशाभूल करणारी माहिती येत आहे. त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. मान्सूनच्या आगमनाबाबत भारतीय हवामान विभागाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.'
- कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

बातम्या आणखी आहेत...