आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोदावरी नदीमध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असले तरी दुसरीकडे गोदावरीचे प्रदूषण रोखण्यात महापालिकेला यश आलेले नसल्याचे चित्र आहे. गोदापात्रात निर्माल्य सोडणे, वाहने धुणे आदी प्रकार सुरूच असून आता सर्रासपणे गोदाकाठावर कपडे धुण्याचे प्रकारची ही सुरू झाले आहे.याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या गोदाकाठावर कपडे धुण्यासाठी शहर परिसरातील महिलांची गर्दी होत आहे. दुतोंड्या मारुतीच्या सांडव्यापासून दक्षिणेच्या भागातील घाटावर महिला सर्रास कपडे धुताना दिसून येत आहेत. स्थानिक महिलांप्रमाणेच बाहेरगावाहून येणारे प्रवासी, भाविकदेखील जुन्या भाजीबाजाराच्या पटांगणाजवळील गाेदाकाठ, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण या भागात कपडे धुताना दिसत आहेत. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून काही दिवस प्रयत्न केले जातात.
काही दिवस गोदावरीत कचरा टाकणारे, निर्माल्य टाकणारे, कपडे धुणारे, वाहन धुणारे आदींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी गोदावरीचा परिसर चकचकीत झालेला होता. मात्र, ही दंडात्मक कारवाई आणि येथील शिस्त महापालिकेला फार काळ टिकवता आली नाही. त्यामुळे गोदावरीची अस्वच्छता वाढत गेली. निर्माल्य कलश ठेवलेले असले, तरी त्यात निर्माल्य, कचरा टाकण्याऐवजी तो इतरत्रच टाकला जात असल्याचे दिसते. गोदाकाठावर कपडे धुण्यासाठी महिलांची एवढी गर्दी झालेली असताना त्यांना कुणी हटवत नाही. त्यामुळे संपूर्ण गोदाकाठ जणू धोबीघाट बनला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.