आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाई भासू:विभागात 58 गावे, 47 वाड्यांना 46 टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

नाशिकरोड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर महाराष्ट्रात यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पाणीटंचाई भासू लागली आहे. नाशिक विभागात ५८ गावांना ४७ वाड्यांना ४६ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई ही नाशिक जिल्ह्यात जाणवत असून सद्यस्थितीत ३१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई भासू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा टँकरद्वारे केला जात आहे. यामध्ये २८ शासकीय तर १८ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. नाशिक जिल्ह्यात ५८ ठिकाणी ३१ टँकर, धुळे ३ ठिकाणी १ टँकर, नंदुरबार २ वाड्यांवर १ टँकर, जळगाव जिल्ह्यात २ गावांना २ टँकर, नगर जिल्ह्यात ४० ठिकाणी ११ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून त्याची पूर्तता करण्याची तयारी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...