आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठवडाभराच्या विश्रांतीनंतर गुरुवारी सायंकाळी बरसलेल्या जाेरदार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी तुंबले. त्यातच बहुतांश ठिकाणची सिग्नल यंत्रणाही अचानक बंद झाल्याने जागाेजागी किमान एक ते दाेन तासांपर्यंत वाहतूक ठप्प झाली. त्यातही गंगापूरराेड, काॅलेजराेड, शरणपूरराेड, कॅनडा काॅर्नर, मायकाे सर्कल, सिडकाे, सातपूर, द्वारका, मुंबईनाका, इंदिरानगर, रविवार कारंजा, सराफ बाजार, भद्रकालीसह इंदिरानगर, उपनगर, नाशिकराेड भागात दाेन ते साडेतीन फुटांपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
शाळा, महाविद्यालये व कार्यालये सुटण्याच्या वेळीच जाेरदार पावसाला सुरुवात झाली. सखल भागात पाणी साचले. अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणाही बंद पडल्याने महत्त्वाच्या सर्वच चाैकांमध्ये वाहतूक ठप्प होत चाकरमान्यांची काेंडी झाली. वाहनधारक किमान दीड-दोन तास एकाच ठिकाणी अडकून पडले. वाहतूक पाेलिस गायब : पाऊस आल्यानंतर शहरातील सिग्नल यंत्रणाही बंद पडली आणि वाहतुकीचा खेळखंडाेबा झाला. सर्वत्र वाहतूक काेंडी झाली असतानाही कुठेही वाहतूक पाेलिस दिसून आले नाही. बऱ्याच वेळानंतर काही ठिकाणी वाहतूक पाेलिस येत काेंडी सुरळीत झाली.
मुख्य चाैकांमध्ये साचले पाण्याचे तळे; नागरिकांचे हाल
गंगापूरराेड : आनंदवली, गंगापूरनाका, सावरकरनगर, पाइपलाइनराेड.
काॅलेजराेड : बीवायके काॅलेज चाैक, भाेंसला काॅलेज, माॅडेल काॅलनी.
शहर परिसर : रविवार कारंजा, सराफ बाजार, दहिपूल, नेहरू चाैक.
सातपूर : सातपूर काॅलनी, अशाेकनगर, श्रमिकनगर.
पंचवटी : मालेगाव स्टॅण्ड, कपालेश्वर मंदिर परिसर, हिरावाडी, रामवाडी, पंचवटी कारंजा.
सिडकाे : उंटवाडी, सिटी सेंटर माॅल, त्रिमूर्ती चाैक, पवननगर, राणाप्रताप चाैक, उत्तमनगर.
नाशिकराेड : दत्तमंदिर, जेलराेड, विहितगाव, देवळाली कॅम्प, भगूर.
शहरात येथे झाली वाहतूक काेंडी
त्र्यबंकेश्वरराेडवर पाणी तुंबले, सिग्नल बंद पडून एमपीए ते मायकाे सर्कल, शरणपूर सिग्नल, एबीबी सर्कल व आयटीआय सिग्नल, सिटी सेंटर माॅल सिग्नल, मुंबईनाका, गडकरी चाैक, सीबीएस, त्र्यंबकनाक्यावरील सिग्नल, गाेविंदनगर बाेगदा, राणेनगर, द्वारका चाैक, पंचवटीतील दिंडाेरीराेड, पेठराेडसह सिडकाेतील खुटवडनगर, शिवशक्ती चाैक, त्रिमूर्ती चाैक, पवननगर, सातपूरला अशाेकनगर, श्रमिकनगर, नाशिकराेड अशी कुठे तासभर, कुठे दीड तास तर कुठे दाेन तास वाहतूक ठप्प झाली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.