आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅस पाइपलाइनचे काम करताना नियोजनबद्ध व योग्य पद्धतीने करणे आवश्यक असताना मनमानी करीत असल्याने सिडकोतील उपेंद्रनगर भागात पिण्याची पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. शिवाय संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शनिवारी (दि. ४) सायंकाळी उपेंद््रनगर येथे अंबड लिंकरोडवर गॅस पाइपलाइनचे काम सुरू असताना जेसीबीने रस्ते खोदत असल्याने त्याचा धक्का पिण्याच्या पाइपलाइनला बसला. यामुळे उपेंद्रनगरपासून पुढे उत्तमनगरपर्यंत तब्बल २ ते ३ किमीपर्यंत संपूर्ण रस्त्यांवर पाणीच पाणी वाहत होते. उपेंद्रनगर येथे याच वेळेत भाजी बाजार सुरू होता. नागरिक भाजी घ्यायला जात असताना त्यांना रस्त्यावरील पाण्याचा त्रास सहन करावा लागला.
कामे करताना निष्काळजीपणा
गॅस पाइपलाइनचे काम करताना ते कसे करावे? याबाबत अनेक नियम आहेत. महत्वाच्या ठिकाणी जेसीबीद्वारे रस्ते न खोदता ते माणसांकडून खोदून घ्यावेत. कारण बहुतेक रस्त्याच्या आतमध्ये भूमिगत वायर, पिण्याच्या पाइपलाइन गेल्या आहेत. त्यांना धक्का न लागता काम होणे अपेक्षित असताना मनमानी सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.