आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रनगरीचा गंभीर पाणीप्रश्न सुटला:नाशिकमधील कामटवाडेच्या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामटवाडेतील इंद्रनगरी परिसराचा गेल्या अनेक दिवसांपासून बिकट बनलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला. याबाबत माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सतत पाठपुरावा केल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचा सत्कार करीत आभार मानले.

इंद्रनगरी परिसरात-गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे महिलावर्गास खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना तर पाण्यासाठी कसरतच करावी लागत होती. महापालिका प्रशासनाकडे अर्ज, विनंत्या करूनही काही उपयोग न झाल्याने शिवसेना विभागप्रमुख पवन मटाले, साधना मटाले यांनी परिसरातील या प्रश्नांत लक्ष घालून तो तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करा असे साकडे बडगुजर यांना घातले असता त्यांनी आधिकाऱ्यांशी संपर्क साधून जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पाणी पुरवठा मार्गातील दोष तातडीने दूर केला. त्यामुळे आता या परिसरात नियमित पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी शाखा प्रमुख रोहित शिंदे, जितेंद्र भालेराव, राजेंद्र सुतार, सुभाष शुकले, दिनेश तेली, डॉ.शरद बगडाने, उज्वला अहिरे, पूनम महाजन, संगीता घाडगे, विजया शिरोडे, मीना पाटील, ललित पवार, कमीका गवळी, आशा सोनवणे, मीरा क्षीरसागर, मंगला शिंदे, स्वाती सोनी, हर्षदा पाटील, उषा महाजन, मंगला महाजन, सुप्रिया घाडगे, शिवानी घाडगे, दीपाली शिरोडे, मनिषा शिरोडे, रुपाली देशमुख, सोनाली खैरनार, पल्लवी अहिरे, दीपा पटेल आदी उपस्थित होते.

इंद्रनगरीचा गंभीर पाणीप्रश्न सुटल्याने आनंद व्यक्त करताना महिला मंडळ व माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याशी भेटून महिला वर्गाने आणून समाधान व्यक्त केले त्याचबरोबर या भागातील इतर समस्यांचा पाडा माजी नगरसेवकांचा मोर मांडला. यावेळी या भागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी देखील विविध समस्या मांडल्या. यावर माजी नगरसेवकाने लवकरच मनापासून अधिकाऱ्यांना बोलावून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...