आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पेठ तालुक्यात 100 महिलांना वॉटर रोलर भेट; इनरव्हील व रोटरी क्लबचा ‘हर घर पाणी’ आदर्शवत उपक्रम

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी पाड्यांवरील महिलांना रणरणत्या उन्हात अनेक मैल पायपीट करून पाणी आणावे लागते. महिलांना पाण्याची वाहतूक करणे सोपे व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ आणि इनरव्हील क्लब ऑफ जेन नेक्स्ट यांच्या वतीने “हर घर पाणी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत पेठ तालुक्यातील १०० आदिवासी कुटुंबांना वॉटर रोलर भेट देण्यात आले.

पेठ तालुक्यातील देवळाचापाडा येथील ५५, पिंपळपाडा येथील २२ व कहांडोळपाडा येथील २३ कुटुंबांना वॉटर रोलर देण्यात आले. या उपक्रमासाठी अनेक व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली. कार्यक्रमाप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ जेन नेक्स्टच्या अध्यक्षा सोनल विजयवर्गीय, सचिव रूपल गुजराथी, प्रकल्प समन्वयक दीपाली चांडक व तृप्ती सोनी, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे अध्यक्ष उमेश राठोड, सचिव गीता पिंगळे, प्रकल्प समन्वयक आशिष चांडक व चंदन सोनी, खजिनदार शाल्मली शेट्टी तसेच पदाधिकारी राजेंद्र धारणकर, हेमेंद्र जोशी, परेश महाजन, कपील पाटील, अगस्त्य मुनीम, जय चांडक, हेतवी जोशी, तुषार माळोदे, माधुरी महाजन, पूजा छाजेड, शीतल देसाई, प्राजक्त मेहता, आदी उपस्थित होते. या उपक्रमास जलसंवर्धन संस्थेचे अशोक कर्डेल, देवीदास कांबळी, दुर्वादास गायकवाड, अनिल गार्डर, संतोष गार्डर यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...