आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:ओंकारनगरमध्ये पाणीटंचाई, नागरिकांची मनपात धाव

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरीरोवरील ओंकारनगर, चाणक्यपुरी सोसायटी, कणसरामाता चौक परिसर, आदर्शनगर परिसरात काही महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी मनपा मुख्यालयात प्रशासनाचे अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ओंकारनगर परिसरामध्ये पाणीपुरवठा एकच वेळ केला जातो कमी दाबाने होत आहे. पहाटे माता भगिनीं समस्येला सामोरे जावे लागते मंगळवारी (दि. ५) परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांच्यासह मनपा आयुक्त,अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांना निवेदन दिले.

मनीषा लोखंडे, विद्याताई काटकर, शकुंतला आवारे, सुनीता गोसावी, सरिता सूर्यवंशी, सुनंदा कुटे, नीता पवार, गीता ठोंबरे, करिश्मा निकम, कल्याणी गडाख, यशवंत कचेरीया, अशोक शिंदे, महाले गुरुजी, तुषार गोसावी, राजेंद्र वैद्य, जनार्दन पाटील, बाळू लवटे, अमित लहामगे, अविनाश महाजन, जयसिंग पवार, अनंत क्षत्रिय, नीलेश पवार, वैभव ठाकूर, सागर महाजन, भगवान तिखे, संजय धात्रक आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...