आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडकोतील सर्वच भागात पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडल्याने अनेक भागात कमी-जास्त दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पाणी गळतीकडे मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्षच नसल्याने सर्वच कारभार रामभरोसे सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. सिडको भागात पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन व्हावे म्हणून गंगापूरसह मुकणे धरणाची पाणीपुरवठा योजना आखण्यात आली आहे. यामुळे पुरून उरेल इतके पाणी नागरिकांना मिळणे सहजशक्य आहे. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कुठे जास्त दाबाने, कुठे कमी दाबाने तर कुठे पाणीच नाही, कुठे वेळच निश्चित नाही. कुठे स्वच्छ तर कुठे अस्वच्छ पाणी असा प्रकार घडत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकारांची थेट आयुक्तांनी दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उन्हाळा संपतोय, मात्र काही भागात कृत्रिम पाणीटंचाई डोकेदुखी ठरत असून अनेक ठिकाणची लिकेज पाइपलाइन दुरुस्त झाली नसल्याने स्थानिक रहिवाशांत नाराजी आहे. लवकरात लवकर हा प्रश्नी निकाली निघणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.