आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यातले संकट:नाशिकमध्ये 1077 धोकादायक वाड्यांचा विजेसह पाणीपुरवठा होणार खंडित; प्रशासकांचे आदेश

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील १०७७ धाेकादायक वाड्यांसह मिळकतीतील रहिवासी काही जागा खाली करण्यास तयार नाहीत. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत येथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा व काेणी ऐकण्यास तयार नसेल, तर संबधित जागेचे क्षेत्रफळ माेजून त्यानंतर येथील वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्याचे आदेश दिले आहेत.

नोटीसचे सोपस्कार

दरवर्षी पावसाळा आला की, शहरातील धोकादायक बनलेल्या जुन्या इमारती, वाडे, घरांना महापालिकेच्या माध्यमातून नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. २०२० मध्ये केराेनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात धोकादायक घरांना नोटीस बजावल्या गेल्या. शहरातील भद्रकाली भागातील जुना वाडा कोसळून राजेंद्र बोरसे नामक व्यक्तीचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाल्यानंतर पालिकेने महापालिकेच्या धोकेदायक घरांना नोटीसा बजावण्याच्या कारवाई केली हाेती.

मे महिन्यात आदेश

२०२१ मध्ये केराेनाचा प्रादुर्भाव नसताना व सर्व काही सुरळीत असताना पावसाळा सुरू हाेण्याची वेळ आली तरी, पालिकेचा अग्निशमन विभाग झाेपेत हाेता. नगररचना विभागाकडून आकडेवारी मिळेल व त्यानंतर कारवाई करण्याची भूमिका असल्यामुळे या प्रशासकीय बेफिकिरीबाबत टीका हाेत हाेती. दरम्यान, आताचे आयुक्त पवार हे मुंबई महापालिकेत सहआयुक्त म्हणून प्रर्दीघकाळ फिल्डवर राहिले असल्यामुळे त्यांनी मे महिन्यातच धाेकादायक वाड्यांचे सर्वक्षण करण्याचे आदेश दिले हाेते.

आयुक्तांच्या सूचना काय?

सर्वेक्षण करून जे वाडे धाेकादायक असतील, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्याही सूचना दिल्या हाेत्या. त्यानंतर संबधित वाडे, इमारत व अन्य मिळकतधारकांना प्रथम नाेटीस देवून सुरक्षितस्थळी हलवण्याबाबत सूचित केले हाेते. त्यानंतरही अनेक मिळकतीत रहिवासी राहत असल्याचे आढळल्यामुळे आयुक्त पवार यांनी दुसऱ्यांदा नाेटीस देवून संबधितांना सुरक्षितस्थळी जाण्यासाठी आदेश करणे, संबधित जागेचे क्षेत्रफळ माेजणे व वीज तसेच पाणी पुरवठा खंडीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

विभाग नोटीस दिलेले धोकेदायक घरे, वाडे

नाशिक पश्चिम ६००

सातपूर ६८

नाशिक पूर्व ११७

नवीन नाशिक २५

पंचवटी १९८

नाशिकरोड ६९

एकूण १०७७

बातम्या आणखी आहेत...