आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारीही कमी दाबाने पाणी:शनिवारी 12 प्रभागांत पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सिडकाेच्या प्रभाग क्र. २४, २५, २६, २२ भागश: व २७, २८, २९, ३१ आणि नाशिक पूर्वमधील प्रभाग क्र. १४, १५, २३, ३० मध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार असून रविवारीही कमी दाबाने पाणी येणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांना शुक्रवारीच पुरेसे पाणी भरून ठेवावे लागणार आहे.

मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या वीज उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी शनिवारी (दि. १७) वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे सिडकोतील आठ व नाशिक पूर्वतील चार प्रभागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ केव्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या उपकेंद्रामधील यंत्रसामग्रीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सिडकाे व नाशिक पूर्व भागात पाणी येणार नाही. रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...