आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाशिक:कोरोनासोबत अर्थचक्रही सुरू ठेवावेच लागेल : शरद पवार; तीन महिन्यांत दीड लाख कोटींचे नुकसान

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेमडेसिविरसह इतर औषधे 5 दिवसांत उपलब्ध होतील : टोपे

नाशिकसह राज्यात काेराेना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असली तरी प्रतिबंधासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत राज्यस्तरावर कुठलाही विचार सुरू नाही. गेल्या तीन महिन्यांत राज्याच्या तिजोरीला तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे आता कोरोनासोबतच आपल्याला अर्थचक्रही अन् त्यासाठी कारखानदारीही सुरू राहील याची दक्षता घ्यावी लागेल, असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत समन्वयाने कामकाज : पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ठाकरे हे सकाळपासून रात्रीपर्यंत अथक कार्यरत राहून काेराेना नियंत्रणाच्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहेत. नाशिकमध्ये ते बैठक घेणार हाेते. मात्र त्यापूर्वी माझी बैठक झाली. लवकरच त्यांचीही बैठक हाेईल. सद्य:स्थितीत आराेग्यमंत्री हे त्या-त्या पालकमंत्र्यांशी समन्वय साधून काेराेना नियंत्रणासाठी उपाय याेजत आहेत. त्यानंतर आराेग्यमंत्री, पालकमंत्री व मुख्यमंत्री हे तिघे चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेत आहेत, हे सांगून पवार यांनी एक प्रकारे राज्यातील सत्ताधारी आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

सत्तेला सलाम... | विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकांना अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये असे आदेश ठाकरे सरकारने काढले असताना सरकारमध्ये कोणतेही संवैधानिक पद नसलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना बैठकीला येताच कुणी हात जोडून तर कुणी कडक सॅल्यूट ठोकून त्यांचे स्वागत केले. त्यामुळे ‘राजकीय पॉवर’चे महत्त्व दिसले.

रेमडेसिविरसह इतर औषधे 5 दिवसांत उपलब्ध होतील : टोपे
अत्यवस्था काेराेना रुग्णांवर उपचारांमध्ये रेमडेसिविर आणि ट्रँग्युझिलम्बसह यासारखी औषधे अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. त्यांचा राज्यात तुटवडा असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आता राज्य शासनाने तीन कंपन्यांना या आैषधांचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या ४ ते ५ दिवसांत ही औषधे संपूर्ण राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.