आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही भारतीय जेवढे पूजेसाठी शांत तेवढेच क्रांतीसाठी शस्रसज्ज:राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचे नाशिक येथे प्रतिपादन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेद, अस्र,शस्र आणि शास्त्र भारतात अनादी काळापासून नांदत आहेत. आम्ही भारतीय जेवढे पूजेसाठी शांत असतो तेवढेच क्रांतीसाठी ही शस्रसज्ज असतो. पूजेतील शांती आणि शस्रातील क्रांती ही भारतीयांची खरी ओळख आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नाशिक येथे बोलत होते.

गुरुवारी (दि.1) भोसला मिलिटरी स्कूलच्या ८५ वा वर्धापन दिनानिमित्ता आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना, सीएचएमई सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे विभागीय अध्यक्ष कॅप्टन एस. जी. नरवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्तानचे भवितव्य उज्ज्वल

यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ब्रिटीशांनी भारतावर राज्य केले खरे पण तेवढ्याच हिंमतीने भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना देश सोडण्यास मजबूर केले. हिंदुस्तानचे भवितव्य उज्ज्वल असून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्मितीसाठी शालेय जीवनापासूनच सैनिक शिक्षण देण्याची नित्तांत आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश संरक्षणदृष्ट्या आत्मनिर्भर होत असल्याचेही ते म्हणाले.

100 सैनिकी शाळा

आपल्या शस्र आणि अस्रांची निर्मिती देशातच करण्याच्या संकल्पनेतून 100 सैनिकी शाळा भारतात निर्माण केल्या जाणार आहेत. 75 टक्के शस्त्र हे भारतातच निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पण बालपणापासून देशभक्ती आणि शस्र चालविण्याचे आणि युद्धनितीचे धडे आम्हा भारतीयांना मिळाले तर भविष्यात कुणीही जवान शहिद होणार नाही. या सर्व सकल्पनांची पायाभरणी 1937 मध्ये डॉ. बाळकृष्ण शिवरामपंत मुंजे यांनी भोसला मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून केल्याचेही त्यांनी सांगितले.

घोडदल, लष्कराची मानवंदना

युध्दात जिंकल्यानंतर शत्रुला गुलाम बनविण्याची आमची परंपरा नाही. हे प्रभु रामचंद्र यांनी सोन्याची लंका जिंकूनही तिच्या मोहात न अडकता माता आणि मातृभुमीला स्वर्ग मानल्याच्या इतिहासातून स्पष्ट होते. यावेळी प्रास्ताविकातून संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचे माहिती महासचिव दिलीप बेळगांवकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांच्या विविध दलांनी संचलन, प्रात्यक्षिकांमधून उपस्थितांची मने जिंकली. घोडदल, लष्कराने त्यांना मानवंदना देत उत्कृष्ठ सादरीकरण केले.

भोसला स्कूलला 25 लाखांची मदत

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला मिलिटरी स्कूलच्या ऐतिहासिक व गौरवशाली परंपरेचे कौतुक केले. येथून शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक भाग्यशाली असून त्यांचे अभिनंदन केले. तर मी राज्यपाल असल्याने फार काही देऊ शकत नसल्याचे सांगत भोसलाला त्यांच्या अधिकारात असलेल्या फंडातून 25 लाख रूपयांची देणगीही यावेळी जाहीर केली.

बातम्या आणखी आहेत...