आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाशिक दौरा:राजकारण करण्यापेक्षा कोरोना कसा दूर होईल यावर काम करावं, पवारांनी फडणवीसांना फटकारले, मुख्यमंत्र्यांवर उधळली स्तुतीसुमनं

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यानी पूर्णपणे कोरोनाच्या कामात स्वतःला वाहून घेतलं आहे असं म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं आहे

कोरोना संकटाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निशाना साधला आहे. पवार आज नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हे वक्तव्य केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत दाखवला तसाच संयम मुस्लिम समाजाने बकरी ईद दिवशी दाखवावा.

देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यासोबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांची नाशिकला येण्याची इच्छा होती. मात्र आम्ही आमचं निरीक्षण मुख्यमंत्र्यांना कळवणार असल्याचंही ते म्हणाले. यासोबतच ठाकरेंच पूर्ण राज्यात लक्ष आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

आज शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नाशिक दौऱ्यावर होते. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता. या स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या दौऱ्याचे नियोजन होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना फटकारले आहे. ते म्हणाले की, या काळात राजकारण करण्यापेक्षा कोरोना काळात त्यांनी कामात लक्ष द्यावे. तसंच कोरोना दूर कसा घालवता येईल ते बघावे. तसंच सध्याचा काळ हा कोणतंही राजकारण करण्याचा काळ नाही. यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावे, असंही शरद पवार म्हणाले.