आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षानंद:शोभायात्रेने नववर्षाचे उत्साहात स्वागत; गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच ठिकठिकाणी गुढी उभारणी व विविध कार्यक्रम

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हिंदू नववर्ष स्वागतानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. पहाटेच्या मंगलमय वातावरणात सुरुवातीला गुढी, ध्वज, भारतमातापूजन करण्यात आले. त्यानंतर महारांगोळीचा मानाचा बिंदू डॉ. विजय मालपाठक यांच्या हस्ते काढण्यात आला. १८०० स्क्वेअर फूट जागेवर रांगोळी रेखाटण्यात आली. शोभायात्रेत रथात आरूढ श्रीराम, लक्ष्मण सीता यांच्या वेशभूषा केलेले चिमुकले अश्व पथक, घोष पथक, टाळ पथक, वेगवेगळे व्यायाम प्रकार, लेझीम पथक, ढोल पथकाचा समावेश होता.

७५ x ३० फूट रांगोळी
नाशिकरोड येथे मुक्तिधाम मंदिरात गुढीपाडव्यानिमित्ताने नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे स्वातंत्र्याची ७५ वर्षे या संकल्पनेवर आधारित रांगोळी काढण्यात आली. मंदिर परिसरात ७५ बाय ३० फुटाची रांगोळी साकारली आहे. नवनाथ वाघचौरे यांनी सपत्निक मानाचा प्रथमबिंदू रेखाटत रांगोळीला सुरुवात केली. पूजा अष्टेकर, सारिका मंचेकर, योगिता बारापात्रे, प्रणिता पाडळकर, मंदाताई मुदलियार, नलिनी कड, अमी छेडा, सीमा कासलीवाल, माधवी नाईक, वैशाली गवळी, शीतल काळे, नाना पाटील, गोपाल लाल, सुरेश जठार यांनी रांगोळी काढली.

बातम्या आणखी आहेत...