आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक जाणीव:स्वच्छतेचा संदेश देत नववर्षाचे स्वागत, 50 किलाे कचरा संकलित

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ओम बजरंग बहुउद्देशीय संस्था व सुजाण नागरिक मंचच्या वतीने पुढाकार घेत नववर्षाचे स्वागत स्वच्छता माेहीम राबवत करण्यात आले. या स्वच्छता माेहिमेच्या माध्यमातून ५० िकलाेहून अधिक कचरा संकलित करण्यात आला.तसेच या माेहिमेच्या माध्यामातून नागरिकांमध्येही परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

‘स्वच्छ नाशिक, संुदर नाशिक’ हेच ब्रीद पुढे नेत ओम बजरंग बहुउद्देशीय संस्था व सुजाण नागरिक मंचच्या वतीने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता माेहीम राबविण्यात येते. सर्वत्र नववर्षाचे स्वागत पार्टी, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केले जात असताना दुसरीकडे या संस्थेच्या वतीने अनाेख्या पद्धतीने स्वच्छता माेहीम राबविण्यात आली. शहरातील नवीन नाशिक परिसरातील महाकाली चाैक येथे स्वच्छता व जागृती अभियान राबविण्यात आले.

या माेहिमेत या संस्थेसह महाकाली हास्य क्लब महिला व सुजाण महिला याेगा संघानेही सहभाग नाेंदविला. महाकाली चाैक, महाकाली मंदिर व मैदानात स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही स्वच्छता माेहीम राबविण्यात आली. या माेहिमेच्या माध्यमातून ५० किलाेहून अधिक कचरा संकलित करण्यात आला. तसेच आपला परिसर, आपले शहर स्वच्छ ठेवावे याबाबत नागरिकांशी चर्चा करत त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली. या माेहिमेत अध्यक्ष बाळू मथुरे, राजू सावंत, दिलीप पाटील, रामदास पानपाटील, दीपक संसारे आदींसह परिसरातील नागरिक सहभागी झाले हाेते.

दर शनिवारी नदी स्वच्छता माेहीम सुजाण नागरिक मंच व ओम बजरंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दर शनिवारी गाेदावरी व नंदिनी नदी परिसरात स्वच्छता माेहीम राबविण्यात येते. याचबराेबर पांडवलेणी व महापालिका उद्यान या ठिकाणीदेखील नियमित स्वच्छता करत शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जाते. केवळ स्वच्छता माेहीमच नव्हे तर हे सदस्य नागरिकांमध्ये जनजागृतीही करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...