आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीचे पार्किंग अंगलट:कार चालक म्हणून नोकरी मागण्यास गेला; पण, चूक नसतानाही नाहक चोरीच्या गुन्ह्यात अडकला!

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार चालक म्हणून नोकरी मागण्यास गेलेला एका चालकाला हाॅटेल मालकाने कार पार्किंग करण्याचे ट्रायल घेण्यास सांगितले. ट्रायलनंतर चालक कार चुकुन शेजारील इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क करुन घरी निघून गेला, पण कारच न दिसल्याने ती चोरी झाल्याची मालकाने पोलिसांत तक्रार दिली. यात गुन्हाही दाखल झाला पण हाॅटेलमधील सीसीटीव्ही तपासल्यानंतर चालकाने कार कार चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याचे निष्पन्न झाले खरे पण चालक नाहक चोरीच्या गुन्ह्यात अडकला. हा प्रकार शनिवार (ता. 11) रोजी सकाळी उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित नाटकर रा. शिकरेवाडी नाशिकरोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गंगापुर रोडवरील हाॅटेल व्हेज अरोमा पार्किंगमधून एमएच 15 एचएम 2688 ही कार चोरी गेल्याची तक्रार गंगापूर पोलिसांत दिली होती. गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तपास केला. घटनेच्या दिवशी एक व्यक्ती कार चालकाची नोकरीसाठी आला असल्याची माहिती मिळाली. सीटीटिव्हीमध्ये कार चालक गाडी पार्क करुन तीन मिनिंटात गाडीची चावी काऊंटरवर जमा करुन निघून गेल्याचे निदर्शनास आले.

चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याने उडाला गोंधळ

पथकाने अजुबाजूला कारचा शोध घेतला असता शेजारीच सम्राट क्युबिन नावाच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये कार पार्क केल्याचे निदर्शनास आले. पथकाने या नविन कार चालकाचा शोध घेतला त्याला सातपूर येथे ताब्यात घेतले. दिपक गणेश धुरंदर ( वय 32) असे त्याने नाव सांगितले. त्याची विचारपुस केली असता, काम मागण्यासाठी हाॅटेलमध्ये गेला होतो. हाॅटेल मॅनेजरने कारची ट्रायल घेण्यासाठी कार पार्किंग करण्यास सांगितली होती. हाॅटेलच्या पार्किंगची जागा माहिती नसल्याने त्याने चुकीने शेजारील इमारतीच्या पार्किंगमध्ये कार पार्क केली. हाॅटेलच्या पार्किंगमध्ये कार मिळून न आ​ल्याने गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. वरिष्ठ निरिक्षक विजय ढमाळ, विष्णू उगले, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, महेश साळुंके, निलेश पवार, समाधान पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...