आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितासंग्रह:‘सोबत काय येते?’ पुस्तकाचे प्रकाशन, कवितेतून संवेदनशील मनाची जाणीव होते ; पुंडलिक वाघ यांंचे प्रतिपादन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर निर्मित व नाशिकचे कवी शरद अमृतकर लिखित सोबत काय येते, या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले. पाहुणे म्हणून कवी विलास पंचभाई, प्रसिद्ध गजलकार अजय बिरारी, कवी संजय गोराडे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी पुंडलिक वाघ आदी उपस्थित होते. पंचभाई म्हणाले की, मराठी साहित्य क्षेत्रात नवनवीन लेखक/ कवी लिहीत आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अमृतकर यांचे यापूर्वी गोधडी आणि मना गावनी माटी असे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या अनेक कवितेतून संवेदनशील मनाची जाणीव होते. तर पुंडलिक वाघ म्हणाले की, लेखकाकडून विषय शोधायची गरज पडत नाही, विषयच त्यांच्याकडे समोर येऊन उभा राहतो. कवी अमृतकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सोबत काय येते हा माझा तिसरा काव्यसंग्रह असून माणूस जन्माला येण्यापासून मरेपर्यंत नुसती धावपळ करत राहतो. त्याने पुस्तकाशी नाते जाेडावे.

संयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन खगेश देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास संजय देव, किशोर अमृतकर, माधुरी दहिवड, सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक मोहोकर, पंडित अमृतकर, शकुंतला अमृतकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...