आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात नेमके काय घडले, सध्या गंभीर रुग्णाची परिस्थिती काय? येथे वाचा

नाशिक(झहीर शेख)17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळ दुपारी साठेबारा वाजेचा..नेहमी प्रमाणे डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयांत ऑक्सिजन टँकमध्ये अॉक्सिझन भरण्यास ऑक्सिजनचा टँकर येते आणि काही क्षणातच ऑक्सिजन टँक लिक होण्याची घटना घडली. अवघ्या अर्ध्यातासात तब्बल 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. जाणून घ्या आज दिवसभरात नेमकं काय झालं...

नाशिकमधील महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसैन या रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. महापालिकेच्या मुख्य कोविड रुग्णालय असलेले डॉ.झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेल्याची घटना दुपारी साडे वाजता घडली. यावेळी 131 रुग्ण महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर काही लोकांना हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवले.

झाकीर हुसेन हॉस्पिटल नाशिक शहरातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल समजले जाते. या ठिकाणी शहरातील नागरिकांसह, जिल्ह्यातील रुग्णांवरही प्रमाणात उपचार केले जातात. 170 बेडचं हे हॉस्पिटल असून त्यामध्ये 17 बेड हे व्हेंटिलेटरचे होते. आज दुपारी रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयातून अतिरिक्त साठा मागवण्यात आला होता. यावेळी ऑक्सिजन टँकमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली आणि दुर्घटना घडली.

बातम्या आणखी आहेत...