आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घशाला काेरड, पाेटाला चिमटा:कामावर जायचे की, पाणी भरायचे ; पाणी नसल्याने सातपूरमधील महिलांचा संतप्त सवाल

सातपूर / मनाेहर घाेणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकाे-सातपूर शहरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. १२०० व्यासाची जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना पाणीटंचाईला ताेंड द्यावे लागत आहे. कामगार वस्ती असलेल्या या दाेन्ही परिसरात टँकरची वेळ निश्चित नसल्याने पाणी मिळवण्यासाठी महिलांना कामावर जाता येत नाही. विशेष म्हणजे जलवाहिनीवर कार्यान्वित गॅस लाइन आल्याने दुरुस्तीत अडथळा निर्माण हाेत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेही किरकाेळ दुरुस्तीच्या कामासाठी धरणातून पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला हाेता. सातपूर-त्र्यंबकरोडवरील अमृत गार्डन चौकात जमिनीत २५ फूट खाेल असलेल्या सिमेंटच्या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अजून दाेन दिवस तरी पाणीटंचाईचे संकट कायम राहणार आहे.

दरम्यान, चार दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या नागरिकांची सकाळच्या दिनचर्येपासूनच अडचण हाेऊ लागली आहे. घरातील महिलांची पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. अनेक महिला, पुरुषांना पाणी मिळविण्यासाठी कामावरही जाता येत नाही. या काळात महापालिका प्रशासनासह सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेऊन खासगी टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू केले आहे. मनसेचे नेते सलीम शेख व सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी गेल्या दाेन दिवसांपासून १५ ते २० खेपांद्वारे खासगी टँकरने नागरिकांना पाणी देण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...