आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:गाडीमध्ये बसत असतानाच मायलेकींनी चोरली औरंगाबादच्या महिला अधिकाऱ्याची पर्स

नाशिकरोड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी स्मिता सुर्यंकात लोंढे या नाशिकरोड येथील महसुल आयुक्त कार्यालयात सरकारी कामानिमित्त आल्या होत्या. काम आटोपून त्या दुसऱ्या दिवशी सकाळी तपोवन एक्सप्रेसने औरंगाबादला निघाल्या होत्या. मात्र गाडीमध्ये बसत असतांनाच मनमाड येथील विमल धोंडु शिंदे (वय ६५) आणि जमुना लक्ष्मण आठवले (वय ४०) यांनी गर्दीचा फायदा घेत स्मिता लोंढे यांची पर्स लंपास केली. मात्र नाशिकरोड रेल्वे पोलीसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही मायलेकींना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन ४० हजार रुपयांचे कानातील सोन्याचे टाँप्स, दोन हजार रुपये रोख जप्त केली. संबधित महिलेला त्यांचा मुद्देमाल परत केला.

रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक महेश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार,औरंगाबाद येथील स्मिता सूर्यकांत लोंढे (वय२८) या १३ जून रोजी शासकीय कामानिमित्त नाशिकरोड येथील महसूल आयुक्त कार्यालयात आल्या होत्या. गाडीने नाशिकरोड रेल्वे स्थानक सोडल्या नंतर काही वेळाने लोंढे यांची पर्स कापून त्यामधील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स व रोख ४ हजार रुपये असे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधून तक्रार दिली. नाशिकरोड लोहमार्गा पोलीसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलीस हवालदार संतोष उफाडे यांनी सीसीटीव्ही कॅमरे पाहून तपास चक्रे फिरवली. उफाडे यांना तपोवन एक्सप्रेसवर गस्त घालत असतांना दोन संशयित महिला त्यांच्या निदर्शनास आल्या. विमल धोंडू शिंदे, ,जमुना लक्ष्मण आठवले या दोंघींना ताब्यात घेतल्यानंतर या मायलेकिना पोलीस नाईक अश्विनी प्रधान, रेल्वे सुरक्षा दलाचे विशाल पाटील, सागर वर्मा यांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. हा तपास अंमलदार ए एस आय सुभाष कुलकर्णी. पोलीस हवालदार संतोष दत्तात्रेय उफाडे, दिपक निकम यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...