आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीएनजी व डिझेल बसेसपोटी मार्च महिन्यात जवळपास ३० कोटींचा तोटा झाला असताना आता महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी धडपड सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत केंद्र शासनाकडून निधी मिळवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून पर्यावरण विभागामार्फत राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला जाणार असून त्यानंतर केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव जाणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी आग्रही असल्यामुळे राज्य शासनामार्फत प्रस्तावाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडील शहर बससेवेचा पांढरा हत्ती महापालिकेने स्वत:च्या अंगणात बांधल्यानंतर ८ जुलै ते मार्च २०२२ या कालावधीत जवळपास ३० कोटींचा तोटा .राज्याच्या पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव देणार नॅशनल क्लिन एअर प्रोग्रामअंतर्गत दाेन टप्प्यात ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठवला जाणार आहे. यापूर्वी केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपाेर्ट विभागाकडे प्रस्ताव पाठवला असला तरी त्यास मान्यता मिळालेली नाही. राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत केंद्रांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. - बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.