आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:पूजाच्या मृत्यूनंतर पुणे कंट्रोलने दिलेला मोबाइल नंबर कुणाचा? संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची चित्रा वाघ यांची मागणी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांत गुन्हा का नाही? पूजाच्या फोनवरील ४५ मिस्ड कॉल कोणत्या संजय राठोड यांचे? या दोन प्रश्नांनंतर “पुणे कंट्रोल रूमवरून दिला गेलेला ९१४६८७०१०० हा फोन नंबर कुणाचा?’ हा तिसरा प्रश्न भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शनिवारी नाशिक येथे उपस्थित केला. पूजा चव्हाणच्या मृत्युप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ही मागणी आपण करत असल्याने आपल्या पतीवर आकसापोटी अपसंपदेचा गुन्हा दाखल केल्याचे त्या म्हणाल्या. कितीही दबाव आला तरी आपण मागे हटणार नसल्याचे स्पष्ट करीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वेगळेपणास साद घालत, राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचे व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आज पवार साहेबांची आठवण येतेय : “आज पवार साहेबांची आठवण येतेय. ते मला वडिलांसारखे आहेत. ५ जूनला आपल्या पतीवर गुन्हा दाखल झाला आणि ७ जूनला साहेबांनी मला बोलावून घेतलं. एफआयआरची कॉपी व सर्व कागदपत्रे वाचल्यावर ते म्हणाले, तुझ्या पतीचा यात काहीच संबंध नाही. ती घटना घडली तेव्हा माझे पती त्या ठिकाणी नव्हतेच. उलट त्या घटनेतील मुख्य सूत्रधार गांधी हॉस्पिटलचे डॉ. गजानन भगत यांना अद्याप चौकशीसाठीही बोलावलेले नाही आणि आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत असताना, केस न्यायालयात सुरू असताना, गुन्हा दाखल केला जातो आणि आम्हाला प्रतही दिली जात नाही, हे सर्व मी गप्प बसण्यासाठीच असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, यावर आता सरकार काय उत्तर देते, ते पाहावे लागेल.

अन्यथा विधिमंडळाचे कामकाजच बंद पाडू : चंद्रकांत पाटील
पूजा चव्हाणप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा सोमवारपर्यंत (दि. १) राजीनामा घ्यावा, अन्यथा विधिमंडळाच्या सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे रान उठवू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
महाविकास आघाडीतील सहा मंत्र्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असताना त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई होत नाही, असेही पाटील म्हणाले. “पूजा चव्हाणप्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ सातत्याने आवाज उठवत असल्यामुळे सरकारने त्यांच्या पतीवर कारवाई सुरू केली आहे. हे सरकार दडपशाहीने कामकाज करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...