आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:कर्नाटकात 5- 6 जागा लढवणार : शरद पवार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात मराठी भाषिकांत एकवाक्यता कशी करता येईल, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मदत कशी होईल हेच आमचे ध्येय आहे. कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार असून येथील लोकांना बदल हवा आहे. तो लोकांना भाजपचे उमेदवार घरी बसवून हवा आहे. आम्ही माेजक्याच ५ ते ६ जागा लढवणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

नाशिक दाैऱ्यावर आलेल्या पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्नाटकात विधानसभेच्या जागा अंदाजे २५० च्या आसपास आहेत. त्यातील पाच जागांवर आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले तर भाजपला फायदा होईल, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही.