आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहार पितापुत्रांची सायकवरून सप्तमोक्षपुरी यात्रा:उद्या करणार शुभारंभ; भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणे हा मुख्य उद्देश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सायकलिंग क्षेत्रात सुपरिचित असलेले गणेश लोहार व त्यांचे दोन सुपुत्र वेदांत व अथर्व हे भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी सप्तमोक्षपुरी यात्रा सायकलिंगद्वारे करणार आहेत. 04 नोव्हेंबर 2022 ला सकाळी 6.00 वाजता काळाराम मंदिर येथून यात्रा सुरू करणार आहेत.

केंद्र शासनाच्या लाईफ मिशन फॉर एन्व्हायरमेंट" याविषयी जनजागृती आणि भारतीय संस्कृती व योग यांच्या प्रचार व प्रसार करणे या मुख्य उद्देशाने ही मोहीम आहे.

सप्त मोक्षपुरीमध्ये अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांचीपुरम, उज्जैन व द्वारका ही नगरे येतात. मोहीम 7 हजार किलोमीटरची असून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा नऊ राज्यांमधून ते प्रवास करणार आहेत. लोहार पिता पुत्र नाशिक येथून प्रवास सुरु करून द्वारका, उज्जैन, मथुरा, हरिद्वार, अयोध्या, काशी, कांचीपुरम व पुन्हा नासिक असा प्रवास करणार आहे.

खाणे ,पिणे, राहणे यांचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसून दिवसभर सायकलिंग करणे, लोकांना भेटणे व सूर्यास्त झाल्यानंतर मिळेल तेथे राहनार, खाणार आहे. त्यांची भगवंत विश्वासावर संपूर्ण सप्त मोक्षपुरी सायकलिंग मोहीम असणार आहे .

दरवर्षी लोहार पिता-पुत्र हे एक लॉंग डिस्टन्स सायकलींग राईड करतात. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी नाशिक कन्याकुमारी नाशिक व ऑक्टोबर 2021 मध्ये नाशिक आयोध्या नाशिक अशा लांब पल्ल्याच्या सायकलि मोहीम त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत.

"कृणवंतो विश्वम आर्यम" ही टॅगलाईन घेऊन ते दरवर्षी सायकलिंग मोहीम करतात. सायकलिंग मोहिमेच्या मुख्य उद्देश भारतीय संस्कृती व योग यांच्या प्रचार व प्रसार करणे हा असतो . यावर्षी सप्त मोक्षपुरी सायकलिंग मोहीमेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मोहीम सात हजार किलोमीटरची आहे व 45 दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. या मोहिमेचा उद्देश भारतीय संस्कृती व योग यांचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच 20 ऑक्टोबर 2022 रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर सुरू केलेल्या "लाईफ मिशन फॉर एन्व्हायरमेंट" याविषयी जाणीवजागृती करणे हाही आहे. रस्त्याने येणाऱ्या गावांमध्ये लोकांना भेटून माहिती देणार आहेत.

गणेश लोहार हे महानगरपालिकेत पदवीधर शिक्षक व नाशिक सायकलीस्टस फाउंडेशनचे संचालक म्हणून काम करतात. भगवंताचा आणि स्वाध्याय परिवाराच्या परमपूजनीय दादाजींचे आशिर्वाद व तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही हे सर्व काही करू शकतो अशी भावना लोहार यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...