आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांना मोठा दिलासा:MBBS विद्यार्थ्यांना आता त्याच कॉलेजमध्ये इंटर्नशिप करावी लागणार, आरोग्य विद्यापीठाचा निर्णय काय?

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आता त्याच कॉलेजमध्ये इंटर्नशिप करावी लागेल, असा महत्त्वाचा निर्णय नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या काळात आपले महाविद्यालय बदलता येणार नाही. यापूर्वी दिल्लीतल्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने 28 नोव्हेंबर रोजी काही अधिसूचना जाहीर केल्या आहेत. तीच अधिसूचना नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 2 मे रोजी लागू केली असून, त्याबाबतचे एक परिपत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

निर्णय का घेतला?

वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी इंटर्नशिप करण्यासाठी कॉलेजचे बंधन नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थी इंटर्नशिपसाठी हवे ते कॉलेज घ्यायचे. याबाबतचे नियमही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे होते. त्यामुळे यामध्ये सारखेपणा आणण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने पुढाकार घेतला. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात या नियमांत बदल करण्यात आला आहे.

विद्यापीठाचे पत्रक काय?

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, यापुढे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालाशी संबंधित रुग्णालयात इंटर्नशिप करावी लागेल. त्यामुळे त्यांना पर जिल्ह्यात किंवा पर राज्यात इंटर्नशिप करता येणार नाही. यापूर्वी विद्यार्थ्यांना एमबीबीएसचा अभ्यासक्रम झाल्यानंतर कुठल्याही महाविद्यालयात इंटर्नशिप करता येत होती.

काय फायदा होणार?

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या निर्णयामुळे संबंधित महाविद्यालयामधील शिकावू डॉक्टरची कमतरता पूर्ण होणार आहे. कारण अनेक विद्यार्थी साडेचार वर्षांचा एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिपसाठी सोयीच्या ठिकाणी जायचे. त्यामुळे त्यांनी जिथे शिक्षण घेतले तिथे डॉक्टरची कमतरता जाणवायची. याचा परिणाम रुग्णसेवेवर व्हायचा. या निर्णयामुळे यापुढे हे टाळले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...