आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बहुचर्चित अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला हे बरंच झालं. नाही तर मुंबई पोलिसांनी कितीही चांगलं काम केलं असतं तरीही ते कुणाला तरी वाचवत आहेत, असाच आरोप झाला असता. पण आता हा तपास सीबीआयकडे गेल्याने टीका करण्याची संधीच राहणार नाही, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. २४) झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यापूर्वी भुजबळांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. आता प्रकरण सीबीआयकडे गेल्याने यातील सत्य लवकरच बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
कुणीतरी नाराज होणारच
निधीवाटपावरून काँग्रेसचे ११ आमदार नाराज झाले आहेत. यासंदर्भात छेडले असता भुजबळ म्हणाले, नाराजांसोबत चर्चा करणार असून तीन पक्षांचे सरकार असल्याने कुणीतरी नाराज होणारच. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष कोणी व्हावे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. अध्यक्ष कोणीही होवो पण काँग्रेस पक्ष मोठा झाला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.