आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतांबर शीरढोणकर, संध्या माने यांचा सन्मान:शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने शासनाच्या वतीने दरवर्षी तमाशा कलावंतांना जीवनगाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गेल्या दाेन वर्षांचे पुरस्कार शासनाने जाहीर केले आहेत. त्यात ज्येष्ठ तमाशा कलावंत आतांबर शिरढाेणकर आणि संध्या माने यांना हे पुरस्कार देण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.

तमाशा रसिकांच्या मनामनात स्थान निर्माण केलेल्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने 2006 मध्ये 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' सुरू केला आहे आणि तमाशा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा दरवर्षी बहाल केला जातो.

संध्या माने आणि आतांबर
संध्या माने आणि आतांबर

आतापर्यंत हा पुरस्कार कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, सुलोचना नलावडे, हरिभाऊ बढे, मंगला बनसोडे (विठाबाईंची कन्या), अंकुश खाडे, भीमा सांगवीकर, गंगाराम रेणके, राधाबाई खोडे, मधुकर नेराळे, लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर, गुलाबबाई संगमनेरकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

यंदा 2019- 20 या वर्षासाठी आतांबर शिरढाेणकर यांना तर 2020-21 या वर्षांसाठी संध्या माने यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. शानसातर्फे एका दिमाखदार साेहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

बातम्या आणखी आहेत...