आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाब विचारला:350 कामगारांचे वेतन राेखले; सिटी लिंक ठेकेदाराला नोटीस

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेतन तसेच बोनस न दिल्याने संतप्त वाहकांनी अचानक कामबंद आंदोलन केल्याने सिटी लिंक बससेवा ठप्प झाली हाेती. याची दखल घेत कंपनीने ‘आम्ही दोन महिने अगोदर वेतन दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांना ते का अदा केले नाही, त्यामुळे आपला ठेका का रद्द करू नये’ असा जाब मॅक्स सिक्युरिटीज या कंपनीला विचारला आहे. संबंधित ठेकेदाराला दोन वेळा नोटिसा बजावल्या आहेत.

८ जुलै २०२१ रोजी सुरू केलेली सिटी लिंक बससेवा पालिकेसाठी पांढरा हत्ती बनली आहे. मात्र तोट्याचे आकडे समोर न आणता भाडेवाडीचा घाट घातला जात आहे. अशातच आता कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही सेवा देण्यासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती केली असून त्याने वाहक, चालक, तसेच अन्य कर्मचारीवर्गाला शासकीय नियमानुसार वेतनासह अन्य सुविधा देणे अपेक्षित आहे. मात्र, वेतनाचा घोळ सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...