आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:महिलेसह तिच्या दोन मुलांनी घेतले विष, महिलेचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील उच्चभ्रू परिसरातील घटना

नाशिक शहरात उच्चभ्रू परिसर असलेल्या सिटी सेंटर मॉल परिसरात महिला आणि तिच्या दोन मुलांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दोन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जाणारा सिटी सेंटर मॉल परिसरात सोनल सुहास शहा या महिलेने आपल्या दोन मुलांसह विष प्राशन केले. या घटनेत सोनल यांचा मृत्यू झाला असून, मुलगा आणि मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच...

बातम्या आणखी आहेत...