आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या चामरलेणीवरुन महिला पडली दरीत!:दोन डॉक्टर बनले देवदूत, 100 फुट खाली जाऊन वाचवले महिलेचे प्राण

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाय घसरून तब्बल शंभर फूटाहून अधिक खोल दरीत पडलेल्या एका महिलेला वेळीच स्वत:चा जीव धाेक्यात घालून दाेन डाॅक्टरांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता जागेवरच प्रथमाेपचार करीत तातडीने रूग्णालयात दाखल केल्याने बेशुद्ध अवस्थेतील जखमी महिलेचे प्राण वाचले. या घटनेत खराेखराेच हे दाेघेही डाॅक्टर महिलेसाठी देवदूत म्हणूनच उभे राहिल्याची प्रतिक्रीया प्रत्यक्षदर्शी व्यायामप्रेमींनी व्यक्त केली.

नाशिकच्या पेठराेडवरील चामरलेणी परिसरात व लेणीवर शेकडाेंच्या संख्येने दरराेज नागरिक फिरावयास येतात. त्यात रविवार (दि.१९) हा सुट्टीचा दिवस असल्याने नेहमीपेक्षा अधिकच गर्दी असल्याने सर्वत्र गर्दी दिसून येत हाेते. इथे अनेक जण पायऱ्या चढून लेणी पर्यंत जातात तर काही अर्ध्यांवरूनच पायऱ्या चढून गेल्यावर पाय वाटेने संपूर्ण टेकडीला गाेल चक्कर मारतात. पायवाट अतिशय अरुंद असल्याने थाेडेही लक्ष विचलित झाले तरी बाजूला खोल दरीत कोसण्याची भीती असते.

याच वाटेवरून जात असताना नाशिक पंचवटी भागत राहणारी एक महिला अशाच्या प्रकारे चक्कर मारत असताना अचानक त्यांचा पाय घसरून त्या थेट बाजूच्या सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळल्या. त्या महिलेसोबत असलेल्या पतीसह इतरांनाही काय करावे काहीच सुचत नव्हते. खाली पडलेल्या महिलेला वाचावायचे कसे? काेणाशी संर्पक साधायचा? काेण खाली उतरणार? अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित हाेत असतानाच त्याच ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले पंचवटीतील डाॅ. रविकिरण निकम आणि डॉ गणेश शिंदे यांना हा प्रकार समजला. ते समाेरच उभ्या असलेल्यांना विचारू लागले की नेमके काय झाले? त्यावर इसमाने सांगितले की याच दरीत ती महिला खाली पडली. दोन्ही डॉक्टर्स नी क्षणाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यात घालून दरीत उतरले.

. रविकिरण निकम
. रविकिरण निकम

खााेलवर जावून महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. त्यांच्या हातापायाला जखमा दिसत हाेत्या. डॉ निकम व डॉ शिंदे यांनी त्वरित प्राथमिक उपचार देत महिलेला शुध्दीवर आणले. ताेच स्वत:च रुग्णवाहिका बोलावून घेतली. इतर नागरिकांच्या मदतीने महिलेला दरीतून वरती आणून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. . या दाेघा डाॅक्टरांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचल्याने अनेकांनी डाॅक्टरंना भेटून त्यांचे काैतुक करीत कृतज्ञता व्यक्त केली.

जीवावर उदार होऊन वाचवला जीव

. गणेश शिंदे
. गणेश शिंदे

ही घटना वेळीच समजल्याने दरीत उतरून त्या महिलेला बघताच त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. मात्र, प्रथमोपचार करून त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारू न त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. दाेघेही मित्र डॉक्टर असल्याने त्यांची व इतर नागरिकांची मदत झाल्याने त्यांना रूग्णालया तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचिवण्यात यश आले.

बातम्या आणखी आहेत...