आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजही गावात पाड्यावर महिलांना बाहेरचे असल्याची भीती मनात ठेवत संबधीत महिलेला भुताटकी, मंत्रतंत्र, करणी ,भानामती,जादूटोणा येते अशा अफवा पसरावक संबधित महिलेला समाजातून दुर करत तीला त्यांच्या जगणे मुश्किल करुन टाकतात. अशा प्रकारे इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील भोरवाडी पाड्यावरील महिलेला भुताळीण असल्याच्या संशयातून तीला अपमानास्पद वागणूक देत तीला समाजातून दुर केले होते. अंधश्रद्धा निर्मुलन च्या पदाधिकाऱ्यांना ही बाब समजताच पाड्यावर जाऊन गावकऱ्यांची बैठक घेत गैरसमज दुर करत महिलेने बनवलेला स्वयंपाक तीच्याच घरात जेवन करत सर्वांचा संभ्रम आणि मनातील भीती दुर करत महिलेला पुन्हा समाजात आणले.
समाजात आजही अंधश्रद्धायुक्त, अवैज्ञानिक गोष्टींवर पारंपरिक समज दृढ असल्याने गैरसमज होऊन, सातत्याने वाद होत आहेत.या घटनेची माहिती कळाल्यानंतर अंनिस च्या कार्यकर्त्यांनी भोरवाडी पाड्यावर भेट देण्याचे ठरवले. घोटी पोलीस स्टेशन येथे अंनिसच्या वतीने पत्र पोलीस दिले. संबंधित महिलेला न्याय मिळावा, सर्वांनी एकत्र राहावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. सहायक निरिक्षक दिलीप खेडेकर यांनी कार्यकर्त्यासोबत पोलिस कर्मचारी दिले. दोन्ही बाजूच्या महिला व पुरुषांना एकत्र आणून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले . केवळ भुताळीन ठरवून त्यातून गैरसमज झाल्याचे स्पष्ट झाले. भुताळीन ठरविलेल्या महिलेला मंत्र, तंत्र, जादूटोणा येत असेल आणि त्यातून जर वाईट घडत असेल असा जर कोणाचा समज असेल तर तो समज दूर करण्यासाठी, भूताळीण ठरवलेल्या महिलेने केलेला स्वयंपाक कार्यकर्त्यांनी सेवन केला. दोन्ही बाजूकडील व्यक्तींनाही सेवन करण्याचे आवाहन केले. इतरांनीही महिलेच्या घरातील अन्न आणि पाणी घेतले. उपस्थितांच्या मनातील अंधश्रद्धांची जळमटं दूर केली.
महिलेला भरवली साखर
गावातील महिलांनी पिडीत महिलेला साखर देत तोंड गोड केले. आम्ही प्रेमाने एकत्र राहू, कुणाला भूताळीण ठरवणार नाही किंवा अंधश्रद्धेतून कुणा महिलेला दोष देणार नसल्याची शपथ घेतली अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे ,कार्याध्यक्ष कोमल वर्दे,सचिन महिरे, हवालदार बी. आर. जगताप यांनी हे कर्तव्य पार पाडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.