आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांडक सर्कल परिसरातील दगडी बिल्डींग म्हणून ओळख असलेल्या शासकीय वसाहतीत गेल्या 10० महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा हाेत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे महिलांसह लहान मुलांना पाण्यसाठी दरराेज वणवण करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही उपयाेग हाेत नसल्यामुळे शनिवारी (दि.11) महिलांनी एकत्र येऊन प्रशासनाचा निषेध केला.
शासकीय निवासस्थानातील पाण्याच्या टाक्यांमध्ये कमी प्रमाणात पाणी पुरवठा हाेत आहे. त्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबियांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याअभावी वसाहतीतील रहीवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत हाेत आहे. कपडे व भांडी धुणे, अंघोळ, स्वयंपाक, बाथरुम, अशा दरोजच्या दैनंदिन कामकाजा करीता पाणी उपलब्ध नसल्याने महिलांसह लहान मुलांना पाणी आणण्यासाठी बाहेर वणवण करत फिरावे लागते.
परिणामी घरात काैटुंबिक वाद उद्भवत असून अनेका मुलांना शाळेला दांडी मारावी लागत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज विनंत्या करूनही उपयाेग हाेत नाही. महापालिकेची जुनी पाइपलाइन काढून त्या ठिकाणी नवीन जलवाहीन्या टाकण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र 10 महिन्यांपासून रहीवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पाण्याची समस्या कायम स्वरूपी निकाली काढण्यासाठी शनिवारी महिलांनी एकत्र येत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान पाण्याच्या गंभीर समस्या न साेडविल्यास हंडा माेर्चा काढण्याचा इशारा कविता मराठे, दिपाली ढेरे, उज्वला ताजणे, छाया पवार, ज्योती राठोड, अनंता सुकले, हर्षल पाटील, पुनम मोरे, रूपाली माळी, प्रभावती रोमन, नजराना शेख, दुर्गा नेटावटे, सविता पवार, चैताली हाडपे, कविता साळुंखे, रंजना राठोड, सोनाली जेजुरकर, अनिता पेठकर आदी महिलांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.