आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकधी त्यांनी एकमेकींचे ‘सांत्वन’ केले तर कधी वयाच्या ‘भिंतीच्या पलिकडे’ डाेकावून जगण्याच्या काही क्षणांचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळं मांडताना ‘तिच्या’ मनातील भावविश्वाला तिनेच साद घातली हाेती. निमित्त हाेते महिला नाट्य स्पर्धेचे.
कामगार कल्याण मंडळातर्फे सिडकाेतील कामगार भवनमध्ये महिला नाट्य स्पर्धेत ११ महिला संघांनी सहभाग घेतला. सर्व संघांमधून ७८ महिलांचा सहभाग हाेता. त्यापैकी ५ संघ विजयी झाले. सातपूरच्या कामगार कल्याण भवनने ‘गाेष्ट दाेघींची’ या नाटकातून साेशल मीडियातून झालेलं प्रेम आणि पदरी पडलेला धाेका यावर भाष्य केले. तर सिडकाेच्या ललित कला भवनने जगण्याच्या, वयाच्या ‘भिंतीच्या पलिकडे’ही शाेध घेण्याचा संदेश दिला. नेहरूनगर कामगार कल्याण केंद्राने ‘सांत्वन’ हे नाटक सादर केले. तर देवळालीगाव केंद्राने मूल हाेत नसेल तर समाजात ज्याला आधाराची गरज आहे असे मूल दत्तक घेण्याचा सकारात्मक विचार ‘चैतन्याचे दीप’ या नाटकातून मांडला. एकलहरे येथील केंद्राने कुमारी मातेला समाजातून मिळणाऱ्या वागणुकीचा विषय उलगडला. सिन्नर केंद्राने मुलाच्या उपचारावर जमापुंजी घातली तर पुढे जगायचं कसं, त्यामुळे त्याला आहे त्या परिस्थितीत ‘डिस्चार्ज’ घेऊन घरी न्यावं लागत असल्याचा विषय मांडला.
सातपूर वसाहत गटाने ‘बायकाेचे प्रेम’ तर सिडकाे वसाहतीने ‘रॅकेट’ हे नाटक सादर केले. गांधीनगर वसाहत गटाने धर्मवाद, दहशतवाद आणि कट्टूरता मांडताना ‘फझर’ नाटकातून उत्कृष्ट अभिनयाचे दर्शन दिले. विहितगाव गटाने ‘माेबाइलचे दुष्परिणाम’ नाटकातून सांगितले. परीक्षक म्हणून अपूर्वा नाईक, विजय शिंगणे आणि पीयूष नाशिककर यांनी काम बघितले.नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सह्याद्री हाॅस्पिटलच्या किरण डांगे यांच्या हस्ते पारिताेषिक वितरण करण्यात आले. यावेळी कामगार कल्याणचे संदेश गाडीलाेहार, शशिकांत पाटाेळे, संदीप चव्हाण, राजेंद्र नांद्रे यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.