आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:5 वर्षीय लेकीचे प्रसंगावधान; पोलिसांच्या तत्परतेमुळे आई मृत्यूच्या दाढेतून परत

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई दरवाजा उघडत नसल्याने चिमुरडी थेट पोलिस ठाण्यात

पाच वर्षांची चिमुरडी बाहेर असताना आईने अचानक दरवाजा लावून घेतला. हाका मारूनही दरवाजा उघडला जात नव्हता. भेदरलेल्या चिमुकलीला काही सुचेना. प्रसंगावधान राखत तिने बाजूला असलेल्या पोलिस चौकीतच थेट धाव घेतली. अाई दरवाजा उघडत नाही, काहीतरी करा हो, असे ती रडवेल्या चेहऱ्याने सांगत होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तडक घराकडे धाव घेतली. दरवाजा तोडला तर महिलेने गळफास घेतल्याचे दिसले. तिचा श्वासोच्छ्वास सुरू होण्यासाठी प्रयत्न केले अन‌् अगदी मरणाच्या दारात पोहाेचलेल्या या महिलेचे प्राण लेकीच्या प्रसंगावधानाने व पोलिसांच्या चपळाईने वाचले.

शुक्रवारी (दि. १३) दुपारी ही घटना घडली. गंजमाळमधील भीमवाडीत ही महिला पती आणि मुलांसह राहते. पोलिसांना प्रथमदर्शनी तर महिला गतप्राण झाल्याचे वाटले. सहकाऱ्यांच्या मदतीने दाेर कापून तिला तत्काळ खाली ठेवल्यानंतर पाठीवर पंप केल्याने तिचा श्वासाेच्छ‌्वास सुरू झाला. पाेलिस वाहनातून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नागरिकांनी केले पाेलिसांचे काैतुक
गंजमाळ पाेलिस चौकीतील सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक शरद सैंदाणे, जितेंद्र माळी, हवालदार नाना जाधव अाणि बीट मार्शल यांनी पळतच मुलीचे घर गाठले. थोडा जरी उशीर झाला असता तरी महिलेच्या जिवावर बेतले असते. महिलेचे प्राण वाचवल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांनी पथकाचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...