आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक मध्ये आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १९ वर्षांखालील महिलांच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत पुणेने नाशिकवर ४ गडी राखून तर रत्नागिरीने धुळेवर ८ धावांनी मात केली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणर्या १९ वर्षांखालील महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धा ( इन्व्हिटेशन लीग ) एक दिवसीय स्वरूपात नाशिक पार पडली.रत्नागिरी , पुणे व धुळेसह नाशिकचा अ गटात समावेश होता. तीनही सामने जिंकून पुणे संघाने गट विजेतेपद तर दोन सामने जिंकून नाशिक संघ उपविजेता ठरला. महात्मानगर मैदानावर नाशिक विरुद्ध पुणे सामन्यात प्रथम फलंदाजी करत नाशिकने ४६.५ षटकांत १६९ धावा केल्या.
श्रृती गीतेने ३० व कार्तिकी गायकवाडने २९ धावा केल्या. पुण्याच्या श्रुती भांगे व रिषिता सईकरने प्रत्येकी ३ ,अक्षया जाधवने २ तर प्रांजली पिसे व शिवांशी कपूरने प्रत्येकी १ बळी घेतला. विजयासाठीच्या १७० धावा पुण्याने ६ गडी गमावून ४८.१ षटकांत पार करत तिसऱ्या विजयाची नोंद केली. अक्षया जाधवने नाबाद ५७ तर प्रांजली पिसेने ४४ धावा केल्या. वैभवी बालसुब्रमणीयमने २ तर सिद्धि पिंगळे व प्रचिती भवरने प्रत्येकी १ बळी घेतला.
दुसऱ्या सामन्यात एस एस के मैदानावर रत्नागिरीने अतिशय चुरशीच्या लढतीत धुळेवर ८ धावांनी मात केली. रत्नागिरीने प्रथम फलंदाजी करत प्रांजल पवारच्या ७९ धावांच्या जोरावर १५१ धावा केल्या. धुळ्याच्या नेहा चव्हाणने ५ तर भूमी निंबाळकर व पूर्वा पाटीलने प्रत्येकी २ बळी घेतले. विजयासाठीच्या १५२ धावा करताना धुळे संघ १४३ पर्यंतच मजल मार शकला. ६९ धावा करणाऱ्या ज्ञानदा निकमची एकाकी लढत अपयशी ठरली. रत्नागिरीतर्फे समृद्धी शिवलकरने ५ ,महेक फैयाजने २ तर वेदिका व कनक यादवने प्रत्येकी १ बळी घेत हि चुरशीची लढत जिंकली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.