आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या कलाकारांचा मलेशियात कथ्थकचा ताल:तबलावादन, भजने सादर करून रसिकांची जिंकली मने; वन्स मोअरची मिळाली दाद

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध कलेत नाशिकचे कलाकार सातासमुद्रापार झेंडा फडकवत असतात. आता नाशिकच्या 13 कलाकार विद्यार्थ्यांनी थेट मलेशियामध्ये आपली कला सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. या कलाकार विद्यार्थ्यांनी कथ्थक, तबलावादन आणि भजने सादर करत रसिकांची मने जिंकली.

नाशिकमधील पवार तबला अकादमी, कलानंद कथक नृत्य संस्था, आदिताल तबला अकॅडमी व के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केले.

कथ्थकचे सादरीकरण

आनंदी अथणी, केतकी चौधरी, श्रावणी मुंगी, ऋतुजा चंदात्रे, तनिष्क तांबट, हिमांशू बर्वे, मंदार पवार, अदिती निलखे, अंकीता शिरसाठ, वैष्णवी जगताप, ऐश्वर्या गोखले, ध्रुव बालाजीवाले, आर्य देशपांडे या विद्यार्थ्यांनी तबला, गायन आणि कथ्थक नृत्य यामधून आपली कला सादर केली.

नृत्य सादर करताना विद्यार्थी
नृत्य सादर करताना विद्यार्थी

वन्स मोअरची दाद

मलेशिया येथे क्वालालंपूर, ब्रिकफिल्ड, मल्लका, कलांग येथे सांगीतिक कार्यक्रमामध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली आणि प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळविली. विविध भजने, ताल प्रस्तुती याद्वारे कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. सूर संगीत म्युझिक सेंटरतर्फे येथे कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी मलेशिया तील अरविंदर सिंग रैना यांचे विशेष सहकार्य लाभले. तबला वादन, भजन, कथ्थक यातून भारताच्या नृत्य, नाट्य, संगीत, वादन संस्कृतीचे दर्शन कलाकारांनी घडवले. मलेशियातील रसिकांनी त्यांना वन्स मोअरची दाद दिली.

या सर्व विद्यार्थ्यांना नाशिकचे प्रसिद्ध कलाकार नितीन पवार, नितीन वारे, सुमुखी अथणी, अविराज तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. हे कलाकार देखील या दौऱ्यात सहभागी झाले होते.

याचे झाले सादरीकरण

या कलाकारांनी तबला वादनात ताल त्रितालमध्ये पेशकार, कायदा, रेला, साईस्तुस्ती, परण, चक्रदार सादर केले. तर श्रीरामचंद्र कृपाळू भजमन, जय दुर्गे दुर्गत परिहारींनी, कृष्ण वंदना, जय जगदीश्वरी माता सरस्वती ही भजने सादर होताना त्यावर विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्य केले.

बातम्या आणखी आहेत...