आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शब्दप्रधान, शास्त्रीय स्वरास पद्न्यासाचा साज ; संगीतकार मिलिंद धटिंगण सहभागी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठे लागलेला कोमल गंधार तर कुठे रंगणारा त्रिताल, स्वर्गीय टिपेला पोहोचलेला आरोह अन अलगद भूतलावर उतरलेला अवरोह... त्याचं स्वागत करायला कथक पदन्यासाने घेतलेली नमस्कार मुद्रा... शब्द, सूर, नृत्याची ही अनुभूती दिली ‘शब्द झुल्यातील गाणी’ या मैफलीने. कुसुमाग्रज स्मारकात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार, गायक मिलिंद धटिंगण यांनी कवितेचं गाणं होतानाचा प्रवास प्रभावीपणे उलगडला.

पं. मकरंद हिंगणे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाला लाभले. संगीता ठाकूर यांच्या रिमझिम ही पुनः की या ध्वनी चित्रफीतीचे प्रकाशन सुप्रसिद्ध गायिका रागिणी कामतीकर यांचे हस्ते प्रदर्शित करण्यात आली. त्याचे संगीत व गायन मिलिंद धटिंगण व राजश्री शिंपी यांचे होते तर पदन्यास डॉ. सुमुखी अथणी यांचा होता. आभा, लाभले आम्हा, कृष्ण कान्हा, कोजागिरी, श्रावण, कोमल गंधार, पेंटर, जरा धुंद गाणे... आदी रचनांना काव्य रसिकांनी भरभरून दाद दिली. यातील शास्त्रीय स्वरसाजाला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाटात आपलेसे केले. शब्दप्रधान गायकी, शास्त्रीय गायनाची बैठक आणि अतिशय समर्पक चाली असा त्रिवेणी संगम धटिंगण यांच्या सादरीकरणातून दिसला.

गायक विवेक केळकर, सुवर्णा क्षीरसागर यांनी काव्यगायन करून आपला ठसा उमटवला.डॉ. सुमुखी अथनी यांच्या पदन्यासातून एकेक कविता उलगडत गेली आणि रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना मध्यमा गुर्जर आणि सागर बोरसे यांनी त्यांना समर्थ साथ दिली. डॉ. स्मिता मालपुरे यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले. या मैफलीत नाशिकचे प्रसिद्ध कवी मिलिंद गांधी, राजू देसले, संगीता ठाकूर-चव्हाण, कविता शिंगणे-गायधनी, संजय कंक, स्वाती पाचपांडे, नंदकिशोर ठोंबरे, सुशीला संकलेचा आणि कै पुष्कर चोळकर यांच्या कवितांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमास रसिक श्राेत्यांची माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती. नवाेदित कलावंतांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...