आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा (दि) येथे रायगड जिल्ह्यातील स्वदेश फाउंडेशच्या माध्यमातून विविध विकासकामे व प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात स्वच्छता अभियानाने करण्यात आली.रायगड जिल्ह्यातील स्वदेश फाउंडेशन संस्था २२ वर्षांपासून ग्रामीण विकास व सक्षमीकरणावर काम करत आहे. जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात संस्थेमार्फत कामे सुरू करण्यात आली आहेत. संस्थेचा मुख्य उद्देश गावाचा सर्वांगीण विकास करणे आहे. यात गाव स्वच्छता, गाव सुंदर बनविणे, सर्वांना गावातच आरोग्याची मुलभूत सुविधा पुरविणे, शिक्षण विषयक उपक्रमात १०० टक्के मुलांना मुलभूत शिक्षण देणे हा आहे.
याचबरोबर सुधारीत शेतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, युवक युवतींना बचतगटाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गावात उपलब्ध साधनांचा वापर करून रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध होतील, या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे वरिष्ठ समन्वयक राजेंद्र गुंड यांनी दिली. उपक्रम यशस्वितेसाठी सरपंच चिमण पवार, ग्रामसेवक मनोहर गायवन, उपसरपंच जयाबाई गायकवाड, संगीता गायकवाड उपस्थित होते. पेठ तालुक्यातील नाचलोंढी, शेवखंडी, गावंधपाडा, पिंपळवटी, गांगोडबारी, कुंभाळे येथे गाव विकास समितीची स्थापना करण्यात आली असून विकासकामे प्राथमिक अवस्थेत सुरू झाली आहे.
प्रशासकीय अनुभवाचा उपयोग करणार स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून गावचा विकास करणे हेच ध्येय आहे. गटविकास अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालो असून आता त्या अनुभवाचा उपयोग गावासाठी करणार आहे. - चिमन पवार, सरपंच, उंबरपाडा
जिल्हाभरात काम सुरू स्वदेश फाउंडेशनच्या वतीने नागरिकांच्या मदतीने त्यांचाच विकास करण्याच्या योजना राबविल्या जातात. सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस आहे. -राजेंद्र गुंड, वरिष्ठ समन्वयक, स्वदेश
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.