आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:‘हिंदुस्तान नॅशनल ग्लास’चे कामगार 16 महिन्यांपासून संपावर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज कंपनीतील सुमारे ४०० कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या १६ महिन्यांपासून संप पुकारलेला आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने संप दुर्लक्षित करून बाहेरच्या राज्यातील कामगारांची भरती करत कामगारांना वेठीस धरल्याचा आराेप सीटूच्या वतीने करण्यात आला. कंपनी व्यवस्थापनाच्या कामगार विराेधी धाेरणाच्या निषेधार्थ साेमवार (दि.२) पासून कामगारांनी उपायुक्त कार्यालयासमाेर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले.हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीजच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी २७ सप्टेंबर २०२१ पासून संप पुकारलेला आहे.

या आहेत मागण्या २७ एप्रिल २०१९ पासून प्रलंबित वेतन वाढ करार करावा {औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार ९१ कायम कामगारांचा ले ऑफ व त्यांच्या राज्यभर केलेल्या बदल्या स्थगित कराव्यात {कामगारांवर दाखल केलेले आरोपपत्र मागे घेण्यात यावे.

बातम्या आणखी आहेत...